पिंपळे गुरवमध्ये पावणेतीन लाखांची घरफोडी

0
420

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – बंद दरवाजाचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत बेडरुममधील कपाटात ठेवलेले २ लाख ९६ हजार ५०० रुपये किमतीचे १०९ ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिणे चोरुन नेले. ही घटना शनिवारी (दि.२०) ते रविवारी (दि.२१) दरम्यान पिंपळे गुरव येथील जवळकरनगरमधील विघ्नहर्ता क्लासिक, घर क्र. ४०२ येथे घडली.

याप्रकरणी अंजली घनशाम गोरवाणी (वय ४२, रा. घर क्र. ४०२, विघ्नहर्ता क्लासिक, जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंजली गोरवाणी यांचे पिंपळे गुरव येथील जवळकरनगरमधील विघ्नहर्ता क्लासिक, घर क्र. ४०२ हे त्यांच्या मालकिचे आहे. शनिवारी (दि.२०) ते रविवारी (दि.२१) या दरम्यान त्यांचे घर कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. तसेच बेडरुममधील कपाटात ठेवलेले २ लाख ९६ हजार ५०० रुपये किमतीचे १०९ ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिणे चोरुन नेले. सांगवी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.