Chinchwad

पिंपळे गुरवमध्ये घरफोडी करुन चोरट्यांनी पळवले पावनेतीन लाखांचे दागिने

By PCB Author

November 21, 2018

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – घरातील लोक कामाला गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंध दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले एकूण २ लाख ४२ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना मंगळवारी (दि.२०) दुपारी एक ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पिंपळे गुरव सुदर्शनगर मधील रुपसंगम रेसिडेन्सी येथील फ्लॅट क्र.४०२ मध्ये घडली.

याप्रकरणी विजय विठ्ठल भांगरे (वय ३८, रा. पिंपळे गुरव, सुदर्शनगर, रुपसंगम रेसिडेन्सी, फ्लॅट क्र. ४०२) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय भांगरे हे पिंपळे गुरव सुदर्शनगर मधील रुपसंगम रेसिडेन्सी येथील फ्लॅट क्र.४०२ मध्ये राहतात. मंगळवारी सकाळी विजय आणि त्यांची पत्नी घराला कुलूप लावून कामावर गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंध दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले ९७ ग्रम वजनाचे एकूण २ लाख ४२ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे.