Chinchwad

पिंपळे गुरवमध्ये गळफास घेऊन एकाची आत्महत्या

By PCB Author

December 03, 2018

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) –  एका ३८ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.२) सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळे गुरव येथील गायत्री कुंज सोसायटीमधील इमारतीच्या टेरेसवर घडली.

दीपक लक्ष्मण कुचेकर (वय ३८, रा. गायत्री कुंज सोसायटी, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  रविवारी (दि.२) सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळे गुरव येथील गायत्री कुंज सोसायटीमधील इमारतीच्या टेरेसवर डिशच्या बारला ओढणीच्या सहायाने दीपक याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला पिंपरीतील वायसीएम रुणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. सांगवी पोलीस तपास करत आहेत.