Chinchwad

पिंपळेसौदागर येथील “मिनी मॅरेथॉन २०१८” ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By PCB Author

October 21, 2018

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन, निर्मला कुटे सोशल फाऊंडेशन व कंम्प्लिट फिटनेस आणि स्पोर्ट्स कंपनी यांच्या सयुंक्तविद्यामाने  आज (रविवारी) “मिनी मॅरेथॉन २०१८” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपळेसौदागर येथील कोकणे चौक ते नाशिक फाटा दरम्यान ही मॅरेथॉन पार पडले.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, अर्जुन पुरस्कार विजेते अर्जुन देवांग, पवना सह बँक व्हा .चेअरमन जयनाथ काटे, कर्मचारी महासंघ अध्यक्ष बबनराव झिंझुर्डे,  पतसंस्था संचालक संजय कुटे, यशदा रियल्टीचेअरमन वसंत काटे, उन्नती फाऊंडेशन अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, सागर काटे, शशी काटे, सामाजिक कार्यकर्त्या चंदा भिसे, नॅशनल बॉक्सर तृप्ती कदम , वेटलिफ्टर मनोजकुमार कवळे, समिर देवरे, योगेश मैंद, दिपक गांगुर्डे, कार्यकर्ते , सोसाटीमधील पदाधिकारी , परिसरातील जेष्ठ नागरिक, महिलांसह लहान मुले उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये ३ किमी , ५ किमी  , ८ किमी आणि ११ किमी अश्या चार टप्प्यामध्ये पार पडली . यात सुमारे ७०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या  “मिनी मॅरेथॉन २०१८”  मध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी -शर्ट्स , प्रमाणपत्र तसेच चारही टप्प्यात अनुक्रमे येणाऱ्या पहिल्या तीन पुरुष व तीन महिला विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र , मेडल तसेच ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले . तर शत्रुघ्न काटे आणि निर्मला कुटे यांनी आभार व्यक्त केले. तसेच मिळालेला प्रतिसाद बघता भविष्यात हि असे उपक्रम राबविण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.