पिंपळेसौदागर येथील  पी.के. चौक ते जर्वरी सोसायटी समोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार!

0
426

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – पिंपळेसौदागर येथील  पी.के. चौक ते जर्वरी सोसायटी समोरील रस्ता रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच हा रस्त्याचे लवकर काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.

पिंपळेसौदागर येथील  पी. के.चौक ते जर्वरी सोसायटी समोरील रस्त्याचा प्रश्न गेली बरेच दिवस रखडले होते. त्यामुळे परिसरातील पादचारी नागरिक आणि वाहन धारकांना ये-जा करण्यास चांगलीच कसरत करावी लागत होती. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी तातडीने स्थापत्य विभाग अधिकारी सोबत पाहणी करून लवकरात लवकर पी. के.चौक ते जर्वरी सोसायटी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या सुचना दिल्या.

दोन्ही भाजप नगरसेवकांनी दिलेल्या सूचनांची दखल घेत स्थापत्य विभागाने पी.के. चौक ते जर्वरी सोसायटी समोरिल रस्ता रुंदीकरण करण्याचे  काम सुरू केले. तसेच लवकरच पी. के.चौक ते जरवरी सोसायटी समोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.