पिंपळेसौदागर पोलिस चौकीत गोंधळ घालून तरुणांकडून पोलिसांना जीवे मारण्याची धमकी

0
4835

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – चिंचवड पोलिस ठाण्यात मद्यपान केलेल्या कलाकार तरुणींनी गोधळ घातल्याच प्रकार ताजा असतानाच पान टपरी समोर सिगारेट पिण्यासाठी गेलेल्या नागरिकाला तिघा टोळक्यांनी कारण नसताना त्रास दिला. त्याना पोलिसांनी चौकीत आणले असात पोलिस चौकीत टेबल, काचेची तोडफोड करून पोलिसांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. हा प्रकार शुक्रवारी (दि. ३१) रात्री दहाच्या सुमारास पिंपळेसौदागर येथे घडला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अनिल गोरख दळवी (वय ३०, रा. रोज लॅन्ड रेसिडेन्सी, पिंपळेसौदागर), अविनाश गोरख दळवी (वय २५) आणि प्रकाश शिवदास कडभने (वय २३, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी सुनील सखाराम बोकड (वय ४३) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी बोकड हे पोलिस चौकीत आत्महत्या झालेल्या घटनेची खबऱ घेत होते. त्यावेळी श्रीधर कडते व त्यांनी बहीण चौकीत आले. कडते हे गणेश पान टपरी, कुणाल आयकॉन रोड येथे सिगारेट घेण्यासाठी गेले होते. सिगारेट घेवून ती ओढत असताना तिघे आरोपी त्या ठिकाणी आले. या ठिकाणी सिगारेट ओढायची नाही असे म्हणून काही एक कारण नसताना लाकडी दांडके, सिंमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. तसेच गळा आवळून पोटवर पाटीवर बेदम मारहाण केली. ही माहिती कडते हे पोलिस कर्मचारी बोकड यांना सांगत होते.

त्यावेळी चिडून या तिघांनी चौकीत गोंधळ घातला. त्यानंतर बाहेर जाऊन फ्लेक्सची लोखंडी पाईप काढून पोलिसांच्या अंगावर धावून आले. शिवाय चौकीतील टेबल, खुर्च्याची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. आणि पोलिसांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

दरम्यान, असाच प्रकार दोन दिवसांपुर्वी चिंचवड पोलिस ठाण्यात घडला होता. मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन कलाकार तरूणींना पोलिसांनी जाब विचारला असता तरुणींनी चिंचवड पोलिस ठाण्यात गोंधळ घातला होता. पोलिसांनी त्या दोघीसह त्यांच्या एका सहकाऱ्याला बेड्या ठोकल्या होत्या. पोलिस तपास करत आहेत.