Chinchwad

पिंपळेसौदागरमध्ये मैदानाच्या भिंतीवर शिवसृष्टी साकारण्याच्या कामाचे भूमीपूजन

By PCB Author

March 07, 2019

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – पिंपळेसौदागरमध्ये वरूण पार्क शेजारील मैदानाच्या सुरक्षा भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित शिवसृष्टी शिल्प साकारण्याच्या कामाचे तसेच खेळाचे मैदान विकसित करण्याच्या कामाचे हभप समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते गुरूवारी (दि. ७) भूमीपूजन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शितल काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक शंकर काटे, ज्ञानेश्वर हांडे, ज्ञानेश्वर काटे, विलास काटे, विजय काटे, संपत मेटे, शिवाजी काटे, पोपट जगताप, अर्जुन काटे, सोपान काटे, शेखर काटे, राजू काटे, प्रकाश काटे, गणेश काटे, एकनाथ ववले, दिगंबर जगताप, प्रमोद काटे, जयवंत बोडके, नितीन काटे, संजय काटे, तानाजी काटे, सुरेश काटे, गोविंद काटे, गोविंद वलेकर, युवराज काटे, सुनील काटे, हरेश नखाते, महापालिकेचे स्थापत्य विभागाचे उपभियंता सुनील पाटील, कनिष्ठ अभियंता नरेश जाधव, हभप विलास काटे, अर्जुन काटे, चंद्रकांत काटे ग्रामस्थ व सोसायटीमधील नागरिक उपस्थित होते.