Chinchwad

पिंपळेसौदागरमध्ये नगरसेविका निर्मला कुटेंच्या जनसंपर्क कार्यालयात गोवर व रुबेला लसीकरण मोहीम

By PCB Author

January 19, 2019

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – केंद्र सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व पिंपरी-चिंचवड़ महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपळेसौदागरमध्ये शनिवारी (दि. १९) गोवर व रुबेला लसीकरण मोहिम राबवण्यात आले. या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने रविवारी (दि. २०) सुद्धा ही मोहिम राबवण्यात येणार आहे.

भाजपच्या नगरसेविका निर्मलाताई संजय कुटे सोशल फाउंडेशनच्या पाठपुराव्यानुसार नगरसेविका निर्मला कुटे यांच्या जनसंपर्क कर्यालयामध्ये गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, जयनाथ काटे, चिंधा कुटे, बाळासाहेब कुटे, चिंतामण गायकवाड आदी उपस्थित होते.

या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या मागणीनुसार ही लसीकरण मोहिम रविवारीही राबवण्यात येणार असल्याचे नगरसेविका निर्मला कुटे यांनी सांगितले. पिंपळेसौदागर आणि रहाटणीमधील नागरिकांनी आपल्या वय वर्ष ९ महीने ते १५ वर्षांच्या मुला, मुलींचे माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत गोवर व रुबेलाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नगरसेविका निर्मला कुटे यांनी केले आहे.