पिंपळेसौदागरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व गाथा भजन सोहळ्याला सुरुवात

0
840

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – पिंपळेसौदागर येथील विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व गाथा भजन सोहळ्याला आळंदी-पंढरपूर वारीचे वंश परंपरागत चोपदार हभप डॉ. बाळासाहेब चोपदार, हभप डॉ. नारायण महाराज जाधव, महंत पुरूषोत्तम महाराज पाटील तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते गाथा पूजन आणि विणापूजन करून शनिवारी (दि. २४) सुरूवात करण्यात आली. २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर यादरम्यान हा सोहळा होणार आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शितल काटे, भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. आळंदी-पंढरपूर वारीचे वंश परंपरागत चोपदार हभप डॉ. बाळासाहेब चोपदार, हभप डॉ. नारायण महाराज जाधव, महंत पुरूषोत्तम महाराज पाटील यांचा नगरसेवक नाना काटे आणि पिंपळे वारकरी संस्थेचे अध्यक्ष संदेश काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिव शंभो सेवा मंडळाचे आजी व माजी पदाधिकारी, गावकरी उपस्थित होते.