पिंपळेसौदागरमधील लिनीअर अर्बन गार्डनमध्ये शहिद जवानांना श्रद्धांजली

965

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – पिंपळेसौदागरमधील नागरिकांनी पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद भारतीय जवानांना लिनीअर अर्बन गार्डनमध्ये आयोजित शोकसभेत श्रद्धांजली वाहिली.

शत्रुघ्न काटे फाऊंडेशनच्या वतीने शहीद वीरपुत्रांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, पवना बँकचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, चंदा भिसे, सुप्रिया पाटिल, झोपे, वाणी, सरदेशपांडे यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते.

नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, “शहीद झालेल्या या विरपुत्रांची कमी तर आपण भरून काढू शकत नाही. परंत, त्यांच्यासाठी पेटवण्यात आलेल्या मेणबत्तीच्या रुपात त्यांचे हे बलिदान देशवासीयांच्या मनात सदैव उजागर ठेवू. तसेच यापुढे दरवर्षी १४ फेब्रुवारी यादिवशी अशाच पद्धतीने आपण या शहीद विरपुत्रांना नमन करण्यासाठी एकत्र जमण्याचा निर्धार करत असल्याचे त्यांनी सांगितले.