Notifications

पिंपळेनिलखमधील साई चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण; आमदार जगतापांच्या हस्ते सोमवारी वाहतुकीसाठी खुला होणार

By PCB Author

December 29, 2018

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – सांगवी ते किवळे बीआरटीएस रस्त्यावर पिंपळेनिलख येथील साई चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या एक लेनचे काम पूर्ण झाले आहे. हा उड्डाणपूल भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी (दि. ३१) सकाळी अकरा वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपळेसौदागरचे भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली. उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे असतील. यावेळी प्रभागाच्या नगरसेविका निर्मला कुटे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका व प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित असतील.