Chinchwad

पिंपळेगुरवमध्ये ब्रह्मचैतन्य योगसाधना आणि फिटनेस सेंटरचे स्नेहसंमेलन उत्साहात

By PCB Author

April 02, 2019

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – पिंपळेगुरव येथील ब्रह्मचैतन्य योगसाधना आणि फिटनेस सेंटरचे स्नेहसंमेलन सोमवारी (दि. १) उत्साहात पार पडले.

पिंपळेगुरव येथील निळू फुले नाट्यगृहात हे स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी नगरसेविका उषा मुंढे, माजी नगरसेवक शंकर जगताप, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री जगताप, पुणे महापालिका शिक्षण विभागाचे क्रीडा प्रमुख राजेंद्र दुमणे, उद्योजक संदिप भंडारी, बाबू ठाकूर आदी उपस्थित होते.

गणेशवंदना सादर करून स्नेहसंमेलनाला सुरूवात झाली. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या सामाजिक व अध्यात्मिक कार्याची दखल घेत संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी सुभेच्छा दिल्या. संस्थेच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून सर्व वयोगटातील नागरिकांच्या शारीरिक व मानसिक तंदुरूस्तीसाठी सातत्याने योगविषयक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर योगोपचाराद्वारे रुग्णांना व्याधीमुक्त करण्यासाठीही उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचा आजपर्यंत हजारो नागरिकांनी लाभ घेतला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका मेधा झणझणे, मीना पवार यांनी केले. सूत्रसंचालन महेश लाहिगुडे, अर्चना सुतार यांनी केले. मीना पवार यांनी आभार मानले.