पिंपरी येथे खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या दोघांना अटक

0
1534

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी येथे खूनाचा प्रयत्न करुन १ वर्षापासून फरार असलेल्या दोघा आरोपींना खंडणी-दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई बुधवार (दि.२३) रावेत येथे करण्यात आली.

सुरज संजय कोळी (वय २२, रा. एकविरा बिल्डिंग, वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि आदित्य श्रीमंत कोटगी (वय २०, रा. बावधन) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

खंडणी-दरोडा विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी एका व्यक्तीचा खूनाचा प्रयत्न करुन आरोपी सुरज आणि त्याचा साथीदार आदित्य हे दोघे फरार झाले होते. बुधवारी खंडणी-दरोडा विरोधी पथकातील पोलीस हवालदार गणेश हजारे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, पिंपरी येथील खूनाच्या प्रयत्नातील दोघे आरोपी हे रावेत येथे हॉटेल राजवाडा येथे उभे आहेत. यावर  खंडणी-दरोडा विरोधी पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून सुरज आणि आदित्य या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पिंपरीतील खूनाच्या प्रयत्नाची कबुली दिली. या दोघांना पुढील कारवाईसाठी पिंपरी पोलीसांच्या हवाले करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.