Banner News

पिंपरी महापालिकेत भाजपाचे विलास मडिगेरी यांना शिवसेना, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून बेदम मारहाण

By PCB Author

June 01, 2020

पिंपरी, दि. 1 (पीसीबी) :  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि भा जपाचे नगरसेवक विलास मडिगेरी यांना आज सायंकाळी स्थायी समितीच्या अँन्टी चेंबरला दोघा नगरसेवकांनी बेदम मारहाण केली.  शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात आले. या वादामागे भूसंपादनाचा  मोबदला खासगी वाटाघाटीने देण्याबद्दलचा प्रस्ताव  हेच महत्वाचे कारण असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणी परस्पर विरोधी  तक्रार दाखल करण्याचे काम संत तुकारानगर पोलिसांकडे सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर महापौर दालनासमोर स्थायी समिती अध्यक्षांचा कक्ष आहे. त्याला लागूनच  स्थायी समिती अध्यक्षांचा अँन्टी चेंबर आहे. तिथे  सांयकाळी सव्वा सहा वाजता हा प्रकार घडला. ऐकमेकांना जाब विचारण्यातून सुरवात झाली आणि वाद वाढत जाऊन त्याचे रुपांतर मारहाणीत झाले.  आरडाओरड एकून काही पदाधिकारी, नगरसेवक मध्यस्थी कऱण्यासाठी धावत आले. या झटापटीत त्यांनाही धक्काबुक्की झाली समजले.  ही मारामारी इतकी जोरात होती की, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जबर जखमी झाले. मयूर कलाटे यांच्या अंगठ्यातून रक्त आले, तर मडिगेरी यांना मुका मार लागला, अशी चर्चा आहे. त्यांना ला था बुक्यांनी मारहाण झाली. महापाैर माई ढोरे यांनी मध्यस्थिचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की झाली. मारहाण प्रकरणात अध्याप पोलिसांत तक्रार दाखल करायचे काम सुरू होते. 

या वादामागचे मूळ कारण भूसंपादनाचा विषय आहे. नऊ महिन्यांपासून भूसंपादनाचा मागील विषय स्थायी समितीत समोर प्रलंबित होता. विलास मडिगेरी समिती अध्यक्ष असताना हा विषय वारंवार तहकूब ठेवण्यात आला होता. खासगी वाटाघाटीने भूसंपादन करायचे, असा तो विषय होता. मडिगेरी यांनी त्याला विरोध केला आणि टीडीआर नुसार मोबदला देण्याचा आग्रह धरला होता. विकास आराखड्यातील आरक्षणांवर अशी शेकडो आरक्षणे मोबदल्याशिवाय पडून आहेत. गेली अनेक वर्षे ज्यांचे भूसंपादन रखडले आणि मोबदलाही मिळालेला नाही असे जमीन मालक त्रस्त होते. स्थानिक मंडळींचीही त्याबद्दल प्रचंड नाराजी होती. या भांडणामागचे मूळ कारण हेच असल्याचे काही नगरसेवकांनी खासगीत सांगितले.

दरम्यान,नगरसेवक मयूर कलाटे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, महापालिकेतील सात हजार कामगारांच्या हिताची धन्वंतरी योजना मडिगेरी यांनी हाणून पा़डली. शहरातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी आरणात आहेत, मात्र त्यांचा मोबदला मिळत नाही. त्यासाठी खासगी वाटाघाटीचा विषय मंजूर करावा,असा आमचा आग्रह होता. वारंवार सांगूनही ते कोणाचेच ऐकत नव्हते, उलटपक्षी त्यांचे वर्तन अत्यंत उध्दट होते. अखेर सहनशिलतेचा अंत झाला आणि घडू नये तो प्रकार घ़डला. आम्ही पोलीसांत तक्रार दिली आहे.

नगरसेवक राहुल कलाटे यांना विचारणा केली असता, किरकोळ बाचाबाची झाली असे ते म्हणाले. नगरसेवक विलास मडिगेरी यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.