Pimpri

पिंपरी महापालिकेतील नागरवस्ती विभागाच्या गलथान कारभाराविरोधात विविध संघटनांचे महापालिकेसमोर आंदोलन

By PCB Author

September 25, 2018

पिेंपरी, दि. २५ (पीसीबी) –  नागरवस्ती विभागाच्या गलथान कारभाराविरोधात तसेच या विभागाचा कारभार सुधारण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने मंगळवारी (दि. २५) पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी नागरवस्ती विभागाच्या कारभारात सुधारणा करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले.

यावेळी आजिज शेख, अजय लोंढे, अमोल उबाळे, संगिता शहा, भारत मिरपगारे, शिवा उबाळे, यांच्यासह शहरातील विविध संघटना, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, महिला, पुरूष आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी महापालिकेच्या नागरवस्ती विभागातील निष्क्रीयता नष्ट करणे, निष्क्रीय अधिकारी कर्मचारी संगटक यांच्या बदल्या करून सक्रीय अधिकारी कर्मचारी संघटक तात्काळ नेमणे, विविध योजना प्रलंबित सर्वच प्रकरणे व येणारे सर्वच प्रकरणे तात्काळ ताबडतोब मार्गी लावणे, नागरवस्ती विभाग व येणारे सर्वच लाभार्थी यांची आठवड्यातून एक समन्वय चर्चा उपाययोजना बैठक कार्यक्रम सुरू करणे. तसेच सात वर्षाचा लेखा-जोखा तपासून दोषी कसूर करणाऱ्या सर्वच योजना प्रकरणे प्रलंबीत अभियान मोहिम सुरू ठेवणे, अशा विविध प्रकारच्या मागण्यासाठी आज (मंगळवारी) आंदोनल करण्यात आले.