Pimpri

पिंपरी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त अण्णासाहेब मगर यांना अभिवादन

By PCB Author

October 11, 2019

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड  महापालिकेच्या  वर्धापन दिनानिमित्त दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच रक्तदान शिबीर, नेत्रदान फॉर्म स्वीकृती शिबीर, रस्सीखेच स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा व प्लॅस्टिक वापरमुक्ती बाबत शपथ आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदान करण्याची शपथ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.