पिंपरी महापालिकेच्या वतीने अल्पदरात एमएस-सीआयटी व टॅलीची प्रशिक्षण सुविधा उपलब्ध

0
431

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत शहरातील विद्यार्थी, महिला व नागरिकांसाठी एमएस-सीआयटी व टॅलीच्या (जीएसटी) प्रशिक्षणाची अल्पदरात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील पाच ठिकाणी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. केवळ दहा टक्के शुल्क भरून प्रशिक्षण घेता येणार असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नियंत्रणाखाली चिंचवड संभाजीनगर येथील थरमॅक्स चौक (९८५००६२६६१), चिंचवड, केशवनगर येथील माध्यमिक विद्यालय (९९६०४८६४७१), भोसरी, लांडेवाडी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय (९७३०३३२३६२), निगडी येथील किर्ती माध्यमिक विद्यालय (९३७१८९४६९४ आणि ९७६६२७९९४१) तसेच पिंपळेगुरव येथील माध्यमिक विद्यालय (९५२७०००३०९) या पाच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एमएससीआयटी (MS-CIT/TALLY(GST) प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.

त्यासाठी एकूण प्रशिक्षण शुल्क तीन हजार आठशे रुपयांपैकी लाभार्थ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून प्रवेश घेता येणार आहे. तसेच महिला प्रवर्ग, अपंग व मागासवर्गीय लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.