पिंपरी महापालिकेच्या आवारात महात्मा गांधीजींचा पुतळा उभारण्याची मागणी

0
509

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवारात महात्मा गांधीजी यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर राहुल जाधव यांच्याकडे केली आहे.

यावेळी आपचे  वहाब  शेख, कपिल मोरे, रागवेंद्रा राव, यशवंत कांबळे, अनूप शर्मा, सुजोय शेट,  सचिन सोनकांबळे, प्रकाश पठारे, चेतन बेंद्रे, सुशील अजमेरा, एकनाथ पाठक, अखिलेश यादव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

देशातील बहुतेक सर्व छोट्या-मोठ्या शहरात महात्मा गांधीजी यांचा पुतळा आहे. परंतू, पिंपरी महापालिकेत गांधीजींचा पुतळा नसावा ही खेदाची गोष्ट आहे. शिवाय लोकांनी गांधी जयंती कशी साजरी करायची?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तरी महापालिका आयुक्तांनी तात्काळ महात्मा गांधीजींचा पुतळा उभारवा, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.