पिंपरी मध्ये कोरोना रुग्णात आढळली ‘सारी’ आजाराची लक्षणं!

0
712

पिंपरी,दि.१०(पीसीबी) – पिंपरीत एका महिलेमध्ये ‘सिव्हीअरली अ‌ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस’ अर्थात सारीची लक्षणं आढळून आली आहेत.

सारी आणि कोरोनाची लक्षणं ही एकसारखीच आहेत. पुण्यातील महिलेला सारीसह कोरोनाचीही लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. राज्यात कोरोना विषाणूचं आव्हान असतानाच राज्यातील विविध शहरांमध्ये आता सारी आजार पसरल्याचं समोर येत आहे.

सारी आणि कोरोनाची लक्षणं एकसारखीच असल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे. सारीच्या एका रुग्णाला कोरोना झाल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे सारीच्या रुग्णांवरही बारीक लक्ष ठेवलं जात आहे.