पिंपरी मध्ये आढळले कोरोना व्हायरसचे ५ रुग्ण!

0
718

मुंबई,दि.१५(पीसीबी) – पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना व्हायरसचे ५ रुग्ण आढळले आहेत, यापैकी चारजण दुबईतून आले आहेत. तर एकजण थायलँडहून आला आहे असंही समजलं आहे. या पाचजणांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

राज्यातल्या करोनाग्रस्तांची संख्या ३१ वर गेली आहे. आणखी पाचजणांचे रिपोर्ट सकारात्मक आल्याने महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही २६ वरुन थेट ३१ वर पोहचली आहे. शुक्रवारी ही संख्या १८ ते १९ च्या घरात होती. मात्र एका दिवसात महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्याही १० ते ११ न वाढली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून मॉल्स, शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. तसंच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असंही आवाहन करण्यात आलं आहे. जे पाच जण नव्याने करोनाग्रस्त आढळले आहेत त्यापैकी एकजण थायलंडहून आला होता. असंही समजतं आहे.