पिंपरी, भोसरी, चिंचवड मतदारसंघातील मतमोजणी सुरूवात

0
1212

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (गुरूवार) सकाळी ८ वाजता सुरूवात झाली. पिंपरी, भोसरी, चिंचवड मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होत आहे. तर मावळ मतदारसंघातील मतमोजणी तळेगांव दाभाडे येथे होत आहे. पिंपरी, भोसरीचा निकाल १ वाजण्याच्या दरम्यान हाती येऊ शकतो. तर चिंचवडचा निकाल   ३ वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे.