Pimpri

पिंपरी भाटनगरमध्ये औषधांच्या दुकानात २२ हजारांची चोरी

By PCB Author

June 20, 2019

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – औषधांच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील २२ हजार ६०० रुपयांची रोख चोरुन नेली. ही घटना मंगळवार (दि.१८) रात्री अकरा ते बुधवार (दि.१९) सकाळच्या सुमारास पिंपरी भाटनगर येथील श्रीसाई मेडिकल या दुकानात घडली.

याप्रकरणी दुकानाचे मालक अरविंद हिंमतराव पुरोहित (वय २५, रा. रुम क्र. ५, सरदार चाळ, चिंचवड स्टेशन) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरविंद यांचे पिंपरी भाटनगर येथे श्रीसाई मेडिकल नावाचे दुकान आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ते दुकान बंद करुन घरी गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील २२ हजार ६०० रुपयांची रोकड लंपास केली. अरविंद बुधवारी सकाळी दुकानावर आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.