पिंपरी पोलिसांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस अटक

0
492

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – महिलेने कंट्रोलला केलेल्या कॉलची पुर्तता करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकासह त्यांच्या सहकारी पोलीस शिपायाने एका तरुणाला मारहाण केल्याच्या कारणावरुन तरुणाच्या मित्राने उपनिरीक्षकासह त्यांच्या सहकारी पोलीस शिपायाच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. ही घटना बुधवारी (दि.१२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपरीतील अशोक टॉकिजजवळ घडली.

याप्रकरणी पोलीस शिपाई रावसाहेब जिजाबा खोडदे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश आलोक शिंदे (वय २८, रा. फ्लॅट क्र. १०६, पहिला माळा, काजल हौसिंग सोसायटी, सुवर्ण मित्रमंडळजवळ, नेहरुनगर, पिंपरी) यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पिंपरीतील अशोक टॉकिजजवळ राहणाऱ्या महिलेने कंट्रोलला फोन केला होता. या फोन कॉलची पुर्तता करण्यासाठी पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निकम, पोलीस शिपाई रावसाहेब खोडदे हे टिम क्र.८ सोबत पिंपरीतील अशोक टॉकिजजवळ पोहचले. यावेळी पोलिसांनी गणेश याच्या एका मित्राला ताब्यात घेतले. यामुळे गणेश याने निकम यांना शिवीगाळ करत अंगावर धावून गेला. या दरम्यान खोडदे यांनी गणेशला अडवण्याचा प्रयत्न केला असता गणेशने खोडदे यांच्या गालात चापट मारली. पोलिसांनी गणेशला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक निकम तपास करत आहेत.