Pimpri

पिंपरी, दापोडीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

By PCB Author

December 06, 2018

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी चौकातील  डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास व संविधानाच्या प्रास्ताविकाच्या कोनशिलेस पुष्पहार अर्पण करून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह अनुयायांनी अभिवादन केले.

आज (गुरूवार) डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरीतील आंबेडकर चौकातील महामानव बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, अनुयायी उपस्थित होते.

तर दापोडीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी हजेरी लावली होती. तर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही पिंपरीत आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.