पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी तर्फे ३ मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स् (MSV) पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांना हस्तांतर

0
329

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी तर्फे ३ मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स् (MSV) पिंपरी चिंचवड पोलिस पोलिस आयुक्तालय यांना हस्तांतर केले. हा उद्घाटन समारंभ श्री.राजेंद्र सिंग, अतिरीक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांचे शुभ हस्ते पार पडला. यावेळी श्री.कृष्ण प्रकाश, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड हे अध्यक्षस्थानी होते. तसेच श्री.रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, श्री.सुधिर हिरेमठ, पोलिस उपायुक्त, श्री.केशव घोळवे, उपमहापौर, पिं.चिं.मनपा. श्री.नामदेव ढाके, गटनेता सत्तारुढ पक्ष, श्री.ज्ञानेश्वर लोंढे, अध्यक्ष स्थायी समिती व श्री.सचिन चिखले, नगरसदस्य, गटनेता मनसे, संचालक स्मार्ट सिटी, श्री.निळकंठ पोमण, सह मुख्य कार्याकारी अधिकारी, व श्री.विजय बोरुडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, इ. उपस्थित होते. सदर ३ मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स् (MSV) पोलिसांच्या गरजेनुसार बनविले असून त्यामध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत.

मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स् (MSV) चे वैशिष्ट्य खालील प्रमाणे—

१ PTZ कॅमेरा (३६० Degree)
४ व्हेईकल HD कॅमेरा
८ पोर्टेबल वायरलेस HD कॅमेरा
२ ऑपरेटर
व्हिडिओ मॅनेजमेंट सॉफ्टवेअर १२ कॅमेरासाठी
एसी. आणि जनरेटर सेट
१ आठवठ्याची व्हिडोओ साठविण्याची क्षमता
१ लॅपटॉप
५५ इंच LED टिव्ही.
मिटिंग रुम
वाहनांसाठी LED लाईटस् (१२० Degree)
४ स्पिकर व सायरन
दंगल प्रतिबंधक उपकरणे
युपीएस
स्ट्रेचर, फ्रस्टेड बॉक्स आणि फायर एक्स्टेंग्चर

पोलिस खात्यासाठी यांचा उपयोग
आषाढी व कार्तिकी वारीसाठी
आळंदी व देहुयात्रेसाठी
मोहरमसाठी
गणेशोत्सवासाठी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी
संप
निवडणुक बंदोबस्त
सार्वजनिक सण
आपतकालिन परिस्थिती
जमाव नियंत्रण

सदरचे वाहन हे अशोक लेलँड यां कंपनीचे उत्पादित असून Mistral, Bangalore या कंपनीमार्फत आवश्यक बदल करुन घेणेत आलेले आहेत. अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा पोलिस दलासाठी उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. मा.पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी शहरातील पदाधिका-यांचे आभार मानुन सदर वाहनांचा उपयोग शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व वेगवेगळ्या आपतकालिन परिस्थितीमध्ये होईल असे सांगितले आहे.