Pimpri

पिंपरी-चिंचवड शहर भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्या निमित्त अभिवादन

By PCB Author

January 16, 2021

पिंपरी,दि.१६(पीसीबी) – भाजपा ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने श्री क्षेत्र तुळापुर येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विणा सोणवलकर, भाजप ओबीसी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश भाऊ रासकर, राजेश डोंगरे, योगेश अकुलवार, शंकर लोंढे, योगेश वाणी, अनिल राऊत, नितीन साळी, सचिन मदने, ललित म्हसेकर, यांसह भाजप ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते .