पिंपरी-चिंचवड शहर पुन्हा बलात्कार प्रकरणाने हादरले; काळेवाडीतील तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्काराचा प्रकार उघड

0
1823

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – काळेवाडीतील साई विहार सोसाटीतमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहणाऱ्या एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस झाली.

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी वाकड पोलीसांना याबाबतची माहिती दिल्यावर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडीतील साई विहार सोसाटीतमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहणाऱ्या एका तीन वर्षाच्या चिमुकलीला आपल्या गुप्त अंगाजवळ त्रास होत असल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला पहिल्यांचा पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पुढील तपासणीसाठी चिमुकलीला पुण्यातील ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. यावर पीडित चिमुकलीचे आई-वडिल तिला घेऊन ससून रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी चिमुकलीची तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. ससून येथील डॉक्टरांनी याबाबत त्वरीत वाकड पोलीसांना प्रकरणाची माहिती दिली. वाकड पोलीसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला. मात्र पोलीस ससून रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच तिचे आई-वडिल चिमुकलीला घेऊन निघून गेले आहेत. यामुळे या बलात्कार प्रकरणाचे गुढ वाढले आहे. वाकड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.