Pimpri

पिंपरी-चिंचवड शहराला अवकाळी पावसाने झोडपले; दिवाळी निमित्त खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांची दमछाक

By PCB Author

November 05, 2018

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने आज (सोमवार) पिंपरी-चिंचवड शहर परिसराला चांगलेच झोडपले. दुपारी साडेतीने ते साडेचार या तासाभराच्या कालावधीत झालेल्या या जोरदार पावसामुळे ठिक ठिकाणी तळे साचल्याले दिसून आले.

तसेच दिवळी निमित्त खेरदीसाठी निघालेल्या नागरिकांची यावेळी चांगळीच तारांबळ उडालेली दिसून आली. तर रस्त्यावरील स्टॉल धारकांनाची देखील दमछाक झाली. मात्र या आवकाळी पावसामुळे  वातावरणात काहीसा गारवा जणवू लागला आहे.