Pimpri

पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्लाझ्मा थेरपी सेंटर त्वरीत सुरू करा..

By PCB Author

July 04, 2020

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका युद्ध पातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा करीत विविध उपचार राबवित आहे. सध्या विविध राज्यामध्ये प्लाझ्मा थेरपीचा प्रामुख्याने वापर करीत आहेत, नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपीच्या प्रोजेक्ट प्ल्याटीना उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हाच उपक्रम विविध राज्यामध्ये यशस्वी ठरत आहे. सदर प्लाझ्मा थेरपीचा वापर केल्यामुळे कोरोना रुग्णांची प्रकृती जलद गतीने स्थिरावत आहे, सदर प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाय. सी. एम. व जिजामाता या दोनीही रुग्णालयामध्ये प्लाझ्मा सेंटर उभारण्याच्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून शासनाच्या लागणाऱ्या सर्व परवानग्या त्वरित घेऊन “प्लाझ्मा सेंटर” सुरू करण्यात यावेत अशी विनंती माजी महापौर योगेश बहल यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्री श्रवण हार्डीकर यांना केली आहे.