पिंपरी चिंचवड शहराने पार केला 25 हजाराचा आकडा

0
439

पिंपरी, दि.5 (पीसीबी):  कोरोना रुग्ण वधत्च आहेत. आज बुधवार (दि.५ ) अखेर महापालिकेने दिलेल्या आकडेवारी नुसार सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या २५,१०६ पर्यंत पोचली आहे. आज बाधित झालेल्याची संख्या ७९८ असून त्यात शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या 3 आहे.

एकूण कोरोना मुक्त रुग्णांची संख्या १७,४०७ तर, रूग्णालयात उपचार सुरू असलेले ४,२८९ आहेत.

पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण ५० रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण ३१९ रुग्ण आहेत.

एकूण मयतांची संख्या ५२१ तर शहरातील एकूण मयतांची संख्या ४२३ आहे. शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या ९८ तर आज मयत १६ आहेत. प्रतीक्षा अहवाल १,६७१ लोकांचा बाकी आहे.

एकूण सॅम्पल १,१२,९७६ तर, अहवाल प्राप्त १,११,३०५ आहेत. आज रुग्णालयात दाखल १,४१९ आणि घरात अलगीकरण केलेले ४०,००३ आहेत.

आज मयत झालेल्या १६ व्यक्ती मधे पुनावळे, भोसरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे गुरव, पिंपळे गुरव, सांगवी, निगडी, पिंपरी,किवळे, चाकण,दापोडी, भोसरी, मोशी,आकुर्डी येथील रहिवासी आहेत.