पिंपरी-चिंचवड शहरात सरासपणे सुरु असलेले अवैधधंदे बंद करा; छावा संघटनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

0
555

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – शहर परिसरात सरासपणे सुरु असलेले मटक, जुगार, गावठी दारु अड्डे तसेच इतर अवैधधंदे त्वरीत बंद करुन पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी कमी करा आणि शहर परिसरात कायदा सुव्यवस्था राखा नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा छावा मराठा संघटनेच्या वतीने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांना दिला आहे.