पिंपरी-चिंचवड शहरात आणखी एका एसीपींची बदली

0
209

पिंपरी, दि. 14 (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहरात आणखी एका एसीपींची बदली झाली आहे. राज्य शासनाच्या गृह मंत्रालयाने याबाबतचे आज आदेश दिले आहेत.

गृह विभागाने बुधवारी (दि. 14) राज्य पोलीस सेवेतील पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक आयुक्त दर्जाच्या तीन पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांची पिंपरी-चिंचवड शहरात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

श्रीकांत डिसले यापूर्वी पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे पोलीस उप अधीक्षक म्हणून कार्यरत होते. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्यांना बदलीचे ठिकाण देण्यात आले नव्हते. त्याबाबत स्वतंत्र आदेश काढणार असल्याचे गृह विभागाकडून सांगण्यात आले होते.

गृह विभागाने बुधवारी त्याबाबत स्वतंत्र आदेश काढून तीन अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.