पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर

0
407

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – आज एकच दिवशी आनंदनगर,वाल्हेकरवाडी, रुपीनगर, बौद्धनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगर, च-होली, सांगवी, नेहरूनगर, दापोडी या परिसरातील 39 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. महापालिका हद्दीबाहेरीलही जुन्नर, राजगुरूनगर, देहूरोड, आंबेगाव, पुण्यातील कसबा पेठ, औध, खडकीतील ११ जणांनाही आज कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पिंपरी महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, जुन्नर येथील कोरोना बाधित रुग्णाचा महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आज मृत्यू झाला आहे. शहरात आता ४९८ कोरोना बाधित रुग्ण आहेत.

महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने तपासाणीसाठी एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे दुपारी रिपोर्ट आले आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर,वाल्हेकरवाडी, रुपीनगर, बौद्धनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगर, च-होली, सांगवी, नेहरूनगर, दापोडी परिसरातील ३९ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे आहेत. त्यामध्ये १९ पुरुष आणि २० महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महापालिका हद्दीबाहेरीलही जुन्नर, राजगुरूनगर, देहूरोड, आंबेगाव, पुण्यातील कसबा पेठ, औध, खडकीतील ११ जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १० पुरुष आणि १ महिलेला बाधा झाली आहे.

जुन्नर येथील रहिवासी असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबळींची संख्या २० वर गेली आहे. त्यामध्ये महापालिका हद्दीबाहेरील १२ तर शहरातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत शहरातील ४९८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २६६ सक्रिय रुग्णांपैकी महापालिका रुग्णालयात २४७ आणि काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरातील ३१ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील तर महापालिका हद्दीबाहेरील २५ रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजपर्यंत २२४ जण कोरोनामुक्त झाले असून शहरातील आठ तर हद्दीबाहेरील १२ जणांचा अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवालानुसार –
– दाखल झालेले संशयित रुग्ण – १४०
– पॉझिटीव्ह रुग्ण – ५०
– निगेटीव्ह रुग्ण – ८१
– चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – २७५
– रुग्णालयात दाखल एकूण संख्या – ५५०
– डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – ९८
– आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – ४९८
– सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – २४०
– शहरातील कोरोना बाधित ३१ रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
– आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – २०
– आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – २२४
– दैनंदिन भेट दिलेली घरे – २४,३८५
– दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – ७०,४२५