“पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक कारखान्यातील कामगारांचे लसीकरण पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कारखान्यातच करून घ्यावे”

0
417

पिंपरी, दि.२९ (पीसीबी) : मा खासदार गजानन बाबर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन केले आहे कि, जवळपास पाच ते सहा हजार मोठे व लघुउद्योग पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असून जवळपास 3 लाखांच्या आसपास  लोकसंख्या ही औद्योगिक कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची आहे.

आज आपण वास्तविकता जर बघितली तर आपल्या राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या 60 ते 70 हजारांच्या संख्येमध्ये वाढत असून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ही संख्या दररोज जवळपास 3 हजारांच्या आसपास वाढत आहे व ही खूप चिंताजनक बाब आहे, तसेच रुग्णांची ही गुणाकाराच्या रूपात संख्या वाढायला सुरुवात झाली आहे, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बेड असतील, व्हेंटिलेटर असतील, ऑक्सिजन असेल, रेमडिसीवर इंजेक्शन असतील याचा तुटवडा वाढत आहे तसेच माननीय मुख्यमंत्री नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आता 1 मेपासून वयवर्ष 18 ते 45 मधील नागरिकांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे व त्यास परवानगी दिली आहे. आपण आज जर पाहिले तर या  वयोवर्षातील कामगार बहुसंख्येने औद्योगिक कारखान्यांमध्ये काम करत आहेत यामुळे जर त्यांना कारखान्यातच लसीकरण करण्याची परवानगी दिली व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने त्याचे आयोजन कारखान्यातच केले तर कोरोनाचा  संसर्ग टाळण्यासाठी खूप मदत होईल व पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे मनुष्य बळ तसेच महानगरपालिकेवरचा व्यवस्थापनाचा ताण, तसेच जागेच्या उपलब्धतेचा प्रश्नही कमी होईल.

तरी वरील सर्व बाबींवर आपण विचार करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने औद्योगिक कारखान्यातील कामगारांचे लसीकरण कारखान्यातच करावे अशी मागणी गजाननजी बाबर यांनी पिंपरी-चिंचवड करांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या आयुक्तांना केली आहे.