पिंपरी-चिंचवड शहरातील अंगणवाड्यांच्या भिंती बोलक्या होणार  

0
764

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील २१५ अंगणवाड्यांच्या भिंती ३ डी पेटींगद्वारे बोलक्या करण्यात येणार आहेत. या कामासाठी ५३ लाख ७५ हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.  याबाबतचा प्रस्ताव शिक्षण मंडळ विभागाकडून सादर करण्यात आला होता. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

महापालिकेच्या सर्व अंगणवाड्यांच्या भिंती ३ डी पेंटींगद्वारे बोलक्या करून घेण्याची कार्यवाही संबंधित मुख्याध्यापक व बालवाडी शिक्षिका यांच्याकडून करून घेण्यात येणार आहे. या कामासाठी प्रत्येक अंगणवाडीला २५ हजार देण्यात येणार आहेत. ही रक्कम संबंधित मुख्याध्यापकाच्या खात्यात  जमा करण्यात येणार आहे.

नागरवस्ती विभागाकडील मदर तेरेसा शिक्षण मंडळाकडील बालवाडी आणि प्राथमिक शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासात्मक योजना या उपलेखाशिर्षातून सदरच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.