पिंपरी-चिंचवड शहराचे पहिले पोलिस आयुक्त म्हणून मान मिळवणारे आर. के. पद्मनाभन यांचा परिचय

0
1216

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) –  पिंपरी-चिंचवड शहराचे पहिले पोलिस आयुक्त म्हणून मान मिळवणारे आर. के. पद्मनाभन हे १९९२च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) पोलिस महासंचालक कार्यालय मुंबई येथे काम पाहिले आहे. त्यांनी दक्षिण मुंबईचे अप्पर आयुक्त म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी पाच वर्ष प्रतिनियुक्तीवर ‘सेबी’मध्ये देखील काम पाहिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात बऱ्याच वर्षांपासूनची स्वतंत्र पोलिस आयुक्तालय होण्याची मागणी होत होती. यावर एप्रिल २०१८ मध्ये राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नवीन पोलिस आयुक्तालयास मंजूरी देण्यात आली होती.

पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकीकरण, शिक्षण संस्था, वाहने यामध्ये वाढ होत असल्याने सध्याच्या यंत्रणेवर ताण येत होता. त्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक परिणामकारकपणे राखता यावी म्हणून पुणे शहर पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

मात्र बऱ्याचदा पोलिस आयुक्तालयाच्या जागेवरुन वाद झाल्याने आयुक्तालय होणार कि नाही यावर शंका व्यक्त होत होती. आज आखेर पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तपदी आर. के. पद्मनाभन यांचा नियुक्तीचा आदेश आल्याने सर्वांना विश्वास बसला आहे.