Pimpri

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष नितीन बनकर यांचे निधन

By PCB Author

March 21, 2019

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष नितीन बनकर (वय ५५) यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने गुरूवारी (दि. २१) सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर भोसरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.