Pimpri

पिंपरी चिंचवड रा.स्व.संघाचा आज विजयादशमी उत्सव

By PCB Author

October 01, 2022

– पिंपरी चिंचवड शहरात १६ स्थानी कार्यक्रम. – संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध भागात १६ स्थानी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रहित,सेवाकार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील १६ विविध भागात मोठ्या संख्येने स्वयंसेवक, नागरिक या उत्सवात सहभागी होणार आहेत. या वेळी शारीरिक, घोष प्रात्याक्षिके, गीत, या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन, वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर दि.५ ऑक्टोबर रोजी विविध भागात पथसंचलनाचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी दिली आहे.

विविध भागातील कार्यक्रम स्थान खालील प्रमाणे – दि.२ ऑक्टोबर – 🔹 संभाजी नगर वक्ते : पद्मश्री गिरीशजी प्रभुणे प्रमुख पाहुणे : डॉ. ललितजी कुमार धोका ( संस्थापक – ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशल स्कूल ) ठिकाण : रामायण मैदान, जाधववाडी वेळ : सकाळी ८:०० वा.

▪️देहुरोड नगर वक्ते : रुपेशजी यादव ठिकाण : महात्मा गांधी विद्यालय, देहूरोड वेळ : सायंकाळी ५:०० वा.

▪️देहूनगर वक्ते : शैलेशजी शिंदे प्रमुख पाहुणे : डॉ. स्वप्नील चौधरी ( नेत्ररोग तज्ञ, कवी ) स्थान – श्रीकृष्ण मंदिरा शेजारी ( माळीनगर- देहू ) वेळ – सायंकाळी ६:०० वा.

▪️निगडीनगर वक्ते : सुहास महाजन ( प.म. प्रांत, घोष प्रमुख ) ठिकाण : राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, मोहननगर वेळ : सायंकाळी ६:००

▪️ चिखली वक्ते : जयंत जाधव प्रमुख पाहुणे : यादवेंद्र जोशी संचालक प्रज्ञानबोधिनी चिखली स्थान – गणेश इंटरनॅशनल स्कूल, नेवाळे वस्ती, चिखली सायं. ५:३०

🔹पिंपळे सौदागर – सायं .५:३० वक्ते:- अमोल पुसदकर स्थान:- पि. के. इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे सौदागर.

🔹पिंपळे निलख:- सायं ६वाजता वक्ते:- सुधीर गाडे स्थान:- चोंधे पाटील स्पोर्ट कॉम्प्लेक्स, पिंपळे नीलख

🔹काळेवाडी सायं ६ वाजता वक्ते :- रविकांत कळंबकर स्थान:- बेबिज इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी

🔹पिंपरी :- २ ऑक्टो सकाळी ७ वाजता वक्ते :- केदार तपिकर स्थान:- नव महाराष्ट्र शाळा ,पिंपरी

🔹चिंचवड पूर्व, पश्चिम :- २ ऑक्टो सायं ५:३० वाजता वक्ते:- सुनिल देसाई स्थान:- कामगार कल्याण मंडळ मैदान, उद्योग नगर चिंचवड.

हिंजवडी गट (आकुर्डी, रावेत, वाकड, हिंजवडी , पुनावळे)* : सायं ५वाजता वक्ते:- नानासाहेब जाधव, प.महाराष्ट्र प्रांत संघचालक स्थान:- कांतीलाल खिवसरा शाळा, वाकड प्रमुख पाहुणे : डॉ. जे. के. सोळंकी , राष्ट्रीय रेडीओ खगोल भौतिकी केंद्र , संशोधन संस्था

🔹भोसरी गट – सायं.५.३० वक्ते:- अतुल अग्निहोत्री प्रमुख अतिथी – प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाफारे, एम.आय. टी.आळंदी स्थान:- न्यू संत तुकाराम पॅलेस हॉल.

🔹सांगवी गट – संत तुकाराम नगर – डॉ. हेडगेवार क्रिडा संकुल वक्ते – केदार तापीकर सायं.६.३०

🔹कासारवाडी – पी सी एम सी शाळा कासारवाडी वक्ते – विलास पवार सायं.६

🔹पिंपळे गुरव रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव वक्ते – सचिन कुलकर्णी सायं.६

🔹सांगवी – न्यु मिलेनियम हायस्कूल, सांगवी वक्ते – निलेश लाळे सायं.६.३०