पिंपरी-चिंचवड येथील SK group सेक्युरीटी आणि बाऊंसर यांच्याकडून पिपरी चिंचवड आयुक्तालय अंकित गुन्हे अन्वेशन विभाग १ (युनिट 1) यांना मास्क वाटप

0
717

 

पिंपरी, दि.२० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड येथील SK group सेक्युरीटी आणि बाऊंसर यांच्याकडून पिपरी चिंचवड आयुक्तालय अंकित गुन्हे अन्वेशन विभाग १ (युनिट १) यांना मास्क वाटप करण्यात आले.

करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस घरांमध्येच होम ‘क्वॉरनटाईन’ करावे, असे आवाहन तांगडे साहेब व SK GROUP यांनी केले आहे.

याच पार्श्वभूमीवर स्वप्नील कांबळे, राजू वारभुवन, बापूसाहेब सरोदे, सुमित मोरे,इरफान काझी, परमिंदर सिंग बाद,sk group सेक्युरिटी आणि बाऊंसर यांच्याकडून गुन्हे अन्वेशन विभाग १ यांना मास्क वाटप करून आरोग्याची काळजी घेणे जरूरी आहे असे ही सूचीत करण्यात आले आहे
यावेळी निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १ उत्तम तांगडे साहेब
PSI काळूराम लांडगे,पोलीस सचिन विश्वास मोरे,पोलीस बाळूसाहेब कोकाटे,पो.प्रमोद गर्जे, पो.आप्पा लांडे,पो.अमित गायकवाड साहेब, सर्व पोलीस कर्मचारी युनिट १ आदी उपस्थित होते.