पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांचा डेंग्यूने मृत्यू

0
825

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता जीवन कृष्णा गायकवाड (वय ५७) यांचा डेंग्यू या आजाराने आज (बुधवारी) पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गेल्या आठ दिवसांपासून ते डेंग्यूशी झुंज देत होते. आज आखेर त्यांची प्राणज्योत मावळली. पुढच्या वर्षी ते निवृत्त होणार होते. त्याच्या मागे पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.