Pimpri

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सेवानिवृत्त होणा-या १५ अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार

By PCB Author

October 01, 2019

पिंपरी, दि. १ (पीसीबी) –  पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या सेवेतून सप्टेंबर २०१९ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १५ अधिकारी व    कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश सुपूर्द करुन करण्यात आला.

महापालिकेच्या कै. मधुकर पवळे सभागृहात  झालेल्या या कार्यक्रमास कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप  उपस्थित होते.

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे, भांडारपाल पंकज फुले, कार्यालयीन अधीक्षक निलिमा बहिरट, उपलेखापाल सुनील कांबळे, मुख्य लिपिक अरुण कापसे, अविनाश जाधव, नितीन ठोंबरे, ए.एन.एम. उज्वला गायकवाड, सिस्टर इनचार्ज कमल पवार, वीजतंत्री रमेश हरिभक्त, फायरमन सुर्यकांत पाटील, मुकादम शोभा घोरपडे, मजूर विठ्ठल आतकर तर स्वेच्छानिवृत्त होणा-यांमध्ये मुख्याध्यापक प्रभावती कांबळे, वाहनचालक चिमनलाल पवार आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे खुशाल पुरंदरे यांनी केले.