पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मानधन व कंत्राटी कामगारांसाठी शनिवारी थेरगावात मेळाव्याचे आयोजन

0
773

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने महापालिकेच्या मानधनावरील व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा शनिवारी (दि. १२) थेरगाव येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

थेरगाव गावठाणातील कैलास मंगल कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता हा मेळावा होईल. महापालिकेच्या मानधन व कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे समान काम व समान वेतन मिळावे, कायम कामगारांप्रमाणेच गणवेश व इतर साधने मिळावीत, आठ तास काम, साप्ताहिक सुट्टी व वैद्यकीय रजा मिळावी, पीएफची रक्कम नियमितपणे शासनाकडे जमा करावी, ओळखपत्र, ईएसआय व वैद्यकीय सेवा मिळावी, ठेकेदारांमार्फत सुरू असलेली आर्थिक पिळवणूक थांबवावी आदी मागण्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांनी सांगितले.