पिंपरी चिंचवड महापालिका विषय समिती सदस्यांची निवड जाहीर

0
259

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शिक्षण, शहर सुधारणा तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या पाच विषय समिती सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड जाहीर केली आहे. पक्षीय बलानुसार भाजपच्या सर्वाधिक सदस्यांची या समित्यांमध्ये वर्णी लागली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या.

विधी समिती : भाजप – स्वीनल म्हेत्रे, वसंत बोराटे, संगीता भोंडवे, सुजाता पालांडे, सीमा चौघुले. राष्ट्रवादी – अनुराधा गोफणे, सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे. शिवसेना – अमित गावडे
महिला व बालकल्याण समिती : भाजप – योगीता नागरगोजे, सविता खुळे, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे. राष्ट्रवादी – गीता मंचरकर, निर्मला कदम, मंगला कदम. शिवसेना – अश्‍विनी चिंचवडे.
शिक्षण समिती : भाजप – सारिका सस्ते, प्रियांका बारसे, मनिषा पवार, माया बारणे, तुषार कामठे. राष्ट्रवादी- मोरेश्‍वर भोंडवे, स्वाती काटे, भाऊसाहेब भोईर. शिवसेना- अश्‍विनी वाघमारे.
शहर सुधारणा समिती : भाजप – साधना मळेकर, सोनाली गव्हाणे, अनुराधा गोरखे, सुनीता तापकीर, शारदा सोनवणे. राष्ट्रवादी- वैशाली घोडेकर, योगीता ताम्हाणे, प्रज्ञा खानोलकर शिवसेना – सचिन भोसले.
क्रीडा समिती : भाजप- अश्‍विनी जाधव, केशव घोळवे, उत्तम केंदळे, शैलेंद्र मोरे, बाळासाहेब ओव्हाळ. राष्ट्रवादी- डब्बू आसवानी, अपर्णा डोके, प्रवीण भालेकर. शिवसेना- रेखा दर्शले.