पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचा-यांसाठी दिवाळी बोनस जाहीर

0
420

पिंपरी, दि. 30 (पीसीबी): पिंपरी चिंचवड महानगरपालिका अस्थापनेवरील कायमस्वरूपी कामकाज करणा-या सुमारे ८५०० कर्मचा-यांना दिवाळी सणानिमीत्त मुळ पगाराच्या ८.३३% बोनस व १५००० रूपये सानुग्रह अनुदान देण्याचे आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत जाहीर केले. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व कर्मचारी महासंघ यांच्यात झालेल्या करारानुसार सदरची दिवाळी भेट कर्मचा-यांना देऊन कर्मचा-यांची दिवाळी गोड व्हावी अशा प्रकारच्या सुचना त्यांनी आयुक्त साहेब यांना दिल्या व त्याप्रमाणे मा. आयुक्त साहेबांनी तातडीने कार्यवाही करत त्याबाबतचे परिपत्रक निर्गत करणेचे आदेश प्रशासनाला दिले.

सदर बैठकीस महापौरांसमवेत पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष (अण्णा) लोंढे, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य तुषार हिंगे, अभिषेक बारणे, शत्रुघ्न काटे, राजेंद्र गावडे, जनतासंपर्क अधिकारी किरण गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे, सुरेश गारगोटे, योगेश रसाळ, शुभांगी चव्हाण, अविनाश ढमाले, बाळासाहेब कापसे, सुभाष लांडे, अविनाश तिकोणे, गोरख भालेकर, योगेश वंजारे, अमित जाधव, नवनाथ शिंदे, रणजित भोसले, मिलींद काटे, बाळासाहेब साठे, धनेश्वर थोरवे, धनाजी नखाते, आदेश रोकडे, गणेश भोसले तुकाराम गायकवाड, नरेंद्र दुराफे, सुरेश पोकळे, तुषार काळभोर नितीन ठाकर, निलेश घुले, व सर्व महासंघ पदाधिकारी उपस्थित होते.

कोविड सारख्या महामारीच्या काळात कर्मचारी वर्गाने स्वताच्या जिवावर उदार होऊन कर्मचारी वर्गाने काम केल्याचे या वेळी मा. महापौर यांनी नमुद केले. तसेच कामगारांची दिवाळी गोड होणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष श्री. अंबर चिंचवडे यांनी मत व्यक्त केले. यावेळी महासंघ कार्यकारिणी तर्फे सर्व सन्मानिय पदाधिकारी, प्रशासन व उपस्थितांचे आभार श्री. सुरेश गारगोटे यांनी मानले.