पिंपरी चिंचवड महानगरपालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने आघाडी केली तर शिवसेनेला काय फायदा?

0
501

पिंपरी, दि.२९ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात परवा मुंबई येथे शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख माजी मंत्री आदरणीय सचिन अहिर यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली आघाडी केली तर शिवसेनेला काय फायदा आहे किंवा स्वबळावर लढले यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या पन्नास जागा निवडून आल्या पाहिजेत यासाठी काय करण करायला हवे प्रत्येक प्रभागात वार्डात शिवसेना पोचली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या शाखा विस्तार झाला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी कोरोना काळात अत्यंत चांगलं कार्य केलं आहे. महागडीच्या मार्फत अनेक विकास कामे देखील झाली आहेत. उदाहरणार्थ गुंठेवारीचा प्रश्न शहरांमध्ये नगरसेवक संख्या वाढ कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे यासंदर्भात मुख्यमंत्री महोदय अत्यंत चांगलं काम केले असून भारतात मध्ये सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची दखल वेगवेगळ्या माध्यमांनी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्य हे घराघरात पोहोचले पाहिजे. शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणूस सर्वसामान्य माणूस कामगार वंचित उपेक्षित दलित पीडित सर्वच समाजाचे कल्याण झाले पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी घेतलेले महाराष्ट्रासाठी आणि पिंपरी-चिंचवड पुणे शहरासाठी निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे. अशी अपेक्षा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख माजी मंत्री सचिन अहिर यांनी व्यक्त केली. यावेळी चर्चा करताना राज्याचे संघटक शिवसेना संघटक गोविंद घोळवे छायाचित्रात दिसत आहेत. वरील मिटिंग महालक्ष्मी रेस कोर्स मुंबई येथे झाली यावेळी ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी राज्य संघटक गोविंद घोळवे यांची नियुक्ती झाल्याबद्दल युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.