Pimpri

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ४ मार्च रोजी नवी सांगवी येथे पवनाथडी जत्रेचे आयोजन

By PCB Author

March 03, 2020

पिंपरी, दि.३ (पीसीबी) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बुधवार दि.४ मार्च ते रविवार दि.८ मार्च २०२० या कालावधीमध्ये पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या पवनाथडीचे उद्धाटन ४ मार्च रोजी पी. डब्लू. डी मैदान, नवी सांगवी येथे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पद्मश्री पुरस्कार राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख आकर्षण (रात्रीस खेळ चाले) निवेदिक अभिनेत्री यांच्या उपस्थित होणार आहे.

या पवनाथडीच्या प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.  आयुक्त श्रावण हर्डीकर,  आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आमदार आण्णा बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, अध्यक्ष अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळ अमित गोरखे,  माजी स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, आदी नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या उपस्थित हा पवनाथडीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.