Pimpri

पिंपरी चिंचवड मध्ये रंगणार स्वरझंकार.

By PCB Author

May 25, 2022

पिंपरी दि. २५ (पीसीबी) -व्हायोलिन अकादमी , MIT World Peace University Faculty of Liberal arts यांच्या संयुक्त विद्यमानाने व पं.आनिंदो चॅटर्जी म्युझिक फाउंडेशन तालपरिक्रमा यांच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे शुक्रवार, शनिवार दिनांक 27 व 28 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता एका विशेष मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष मैफिलीमध्ये पहिल्या दिवशी शुक्रवारी पहिल्या सत्रात आनंद गंधर्व आनंद भाटे यांचे गायन होणार असून त्यांना तबला साथ श्री. भरत कामत व संवादिनी वर साथ श्री. सुयोग कुंडलकर करणार आहेत. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पंडित अतुलकुमार उपाध्ये व श्री तेजस उपाध्ये यांची व्हायोलिन जुगलबंदी होणार असून त्यांना तबला साथ पंडित अनिंदो चॅटर्जी करणार आहेत.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात श्री. चिराग कट्टी यांचे सतार वादन होणार असून त्यांना तबला साथ श्री. अनुव्रत चॅटर्जी करणार आहेत, तसेच कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात तालऋषी अनिंदो चॅटर्जी याचे सोलो तबला वादन होणार आहे. त्यांना श्री. समीर सूर्यवंशी व श्री.मिलिंद कुलकर्णी हे साथ संगत करणार आहेत.

या कार्यक्रमाला पु. ना गाडगीळ आणि सन्स व ए. सी. एम. एफ. तालपरिक्रमा यांचे विशेष सहकार्य लाभले असून. लोकमान्य मल्टिपर्पज, विलो पंप्स, ऑर्लीकोण बालझर्स, हॉटेल रत्नलोक आणि चितळे एक्सप्रेस हे सहप्रायोजक आहेत.

सदर कार्यक्रम प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास प्रवेशमूल्य असून कार्यक्रमाच्या प्रवेशिका रामकृष्ण मोरे सभागृह येथे उपलब्ध आहेत. अशी माहिती स्वरझंकार चे राजस उपाध्ये यांनी दिली.