पिंपरी-चिंचवड मधून चार दुचाकी, एक रिक्षा चोरीला

0
336

निगडी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या चिखली, हिंजवडी, पिंपरी, निगडी मधून चार दुचाकी आणि देहूरोड परिसरातून एक रिक्षा चोरीला गेली आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 11) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धनपट मनसाराम यादव (वय 23, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यादव यांच्या घराच्या समोरील रस्त्यावरून फिर्यादी यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही मंगळवारी (दि. 11) सकाळी उघडकीस आली.

गणपत चुनाराम सुतार (वय 41, रा. बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घराजवळून त्यांची 22 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी उघडकीस आली आहे.

वैभव अकुंश मोहक (वय 26, रा. फुगे आळी, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी टाटा कंपनीच्या गेट समोरून चोरीला गेली आहे. ही घटना 17 डिसेंबर 2021 रोजी दुपारी दोन ते रात्री सव्वाअकरा वाजताच्या कालावधीत घडली.

भूषण रमेश चौधरी (वय 29, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी पवळे उड्डाणपुलाजवळील पार्किंगमधून चोरीला गेली. ही घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी घडली.

रावेत येथून तीन चोरट्यांनी एक रिक्षा आणि पाईप असा 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 11) पहाटे घडली. सुशील राजेश पिल्ले (वय 20), नौशाद नजीर शेख (वय 23), ऋतिक संजय मेडी (वय 18, सर्व रा. राजीव गांधीनगर, देहूरोड, रावेत) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय स्वरुपचंद पाचोरे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पंजाबराव परशुराम हेलोडे (वय 42, रा. आंबडवेट, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांचा ट्रक घेऊन नवलाखउंब्रे एमआयडीसी येथे जात असताना त्यांच्या ट्रकला एकाने थांबवले. त्यावेळी फिर्यादी यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन ट्रकच्या सीटवर राहिला. तो मोबाईल फोन अनोळखी चोरट्याने चोरून नेला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी आठ वाजता माण रोडवर घडली.