पिंपरी चिंचवड मधील ‘या’ भागांतील अनेक अनधिकृत बांधकामे भुईसपाट

0
321

मोशी,दि.२४(पीसीबी) – मोशीतील डीपी रस्त्याने बाधित चार अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरु केली आहे.

मंगळवारी ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय एकूण 4 अनधिकृत बांधकाम असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 566 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आली आहेत. एक पोकलेन , एक जेसीबी , 10 मजूर व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त अजित पवार , सह शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या नियंत्रणात उपअभियंता हेमंत देसाई, कनिष्ठ अभियंता, बीट ऑफीसर यांच्या पथकाने कारवाई केली.