Pimpri

पिंपरी-चिंचवड भाजयुमोच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन

By PCB Author

November 28, 2018

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आद्य समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरीतील त्यांच्या पुतळ्यास बुधवारी (दि. २८) पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, प्रदेश युवा मोर्चा सचिव अनुप मोरे, प्रभाग स्वीकृत सदस्या वैशाली खाडये, युवा मोर्चाचे अजित कुलथे, दिपक नागरगोजे, मधुकर बच्चे, राहुल शिंदे, गणेश संभेराव, तेजस्विनी कदम, मंगेश धाडगे, किशोर ब्राम्हणकर, पंकज शर्मा, सागर फुगे, सचिन बंदी, भागवत मुंडे, सोनल वर्मा, अमोल दामले, अमित देशमुख, गोपाल मंडल, पंकज वेंगुर्लेकर, शुभम कपिले, सागर कापसे आदी उपस्थित होते.